शुगर कंट्रोल करण्याचे बरेच उपाय परिणामाकारक ठरतात यामुळे सतत लघवी येणं, तहान लागणं, जखम भरण्यासाठी वेळ लागणं यांसारखी गंभीर लक्षणं जाणवतात. डायबिटीसवर कोणतेही उपचार आलेले नाहीत. वाढलेली सारखेची पाकळी शरीरातील अनेक अवयवांना इजा पोहोचवू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांच्या सेवनानं साखरेची पातळी वाढत नाही. याशिवाय नियमित स्वरूपात व्यायाम करण्याचाही सल्ला दिला जातो.
डायबिटीसचे घरगुती उपाय
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवून मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. यासाठी औषधांसोबत अनेक घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आहेत. पेरूची पाने हा देखील मधुमेहावरील घरगुती उपायांपैकी एक आहे. पेरूची हिरवी पाने मधुमेहावर कशी नियंत्रण ठेवू शकता ते समजून घेऊया.
NCBI च्या अहवालानुसार, पेरूच्या पानांचा औषधी गुणधर्मांमुळे अनेक देशांमध्ये औषध म्हणून वापर केला जातो. विशेषतः पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये, पेरूच्या पानांचा रस मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरला जातो. पेरूच्या पानांच्या रसामुळे काही प्राण्यांच्या मॉडेल्समध्ये अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म आढळून आले आहेत आणि यामुळेच पेरुचे सेवन रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकते. यामुळेच जपानसह अनेक देशांमध्ये पेरूच्या पानांचा चहा घेतला जातो.
पेरूच्या पानांचा चहा दीर्घकालीन उपचारांसाठी आहारोपचार म्हणून उपयुक्त मानला जातो. एका मानवी अभ्यासात असे आढळून आले आहे की पेरूच्या पानांच्या चहाचे प्रत्येक जेवणासोबत सतत सेवन केल्याने हायपोएडिपोनेक्टिनेमिया आणि हायपरग्लाइसेमिया सुधारतो. म्हणजे पेरूच्या पानांपासून चहा बनवून पिऊ शकता किंवा बाजारातून विकत घेऊ शकता.