Latest Marathi News

BREAKING NEWS

आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट्स, वस्त्रोद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत चंद्रकांत पाटील यांनी साधला संवाद

0

नागपूर |

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आहेत. बुधवारी त्यांनी आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट्स, वस्त्रोद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत रवी भवन, नागपूर येथे मनमोकळा संवाद झाला.

चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी नागपूर येथे विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद साधला. उपस्थितांनी देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काही प्रश्न विचारले, ज्याची उत्तरे चंद्रकांत पाटील यांनी मनमोकळेपणे दिली. उपस्थितांसोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा चंद्रकांत पाटील यांनी केली. या वेळी माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे आणि विविध क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.