मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यामुळे राहुल गांधींना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही जल्लोष साजरा केला जात आहे. विधानभवन परिसरातच काँग्रेस नेत्यांनी पेढे भरवत अभिनंदन केलं. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा :सर्वोच्च न्यायालयाकडून ‘मोदी आडनाव’ खटल्यात राहुल गांधींना मोठा दिलासा
हेही वाचा :आजपर्यंत भारतीय मुस्लिमांचा हिरो औरंगजेब कधीही नव्हता, देवेंद्र फडणवीसांचं विधान
“सत्याचा विजय झाला आहे. आजचा निकाल म्हणजे संविधानाचा विजय आहे. हा द्वेषाला कठोर फटकार आहे. राहुल गांधींचा आवाज देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचेल. येत्या काही दिवसांत देशातील हुकूमशाही उद्ध्वस्त केली जाईल. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, ज्यांची उद्दिष्टे खरी आहेत आणि ज्यांची मेहनत शुद्ध आहे अशाव्यक्तींबाबतच असा निकाल लागतो.