Latest Marathi News

BREAKING NEWS

सर्वोच्च न्यायालयाकडून ‘मोदी आडनाव’ खटल्यात राहुल गांधींना मोठा दिलासा

0

मोदी आडनाव बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा दिला आहे. या निकालामुळे राहुल गांधी पुन्हा संसदेत येऊ शकतील. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, हायकोर्टाने शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही. सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटले आहे की, राहुल गांधींचे विधान अयोग्य आहे आणि सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगलं पाहिजे.

हेही वाचा :आजपर्यंत भारतीय मुस्लिमांचा हिरो औरंगजेब कधीही नव्हता, देवेंद्र फडणवीसांचं विधान

हेही वाचा :‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुंबईला फटका; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारवर साधला निशाणा

गुजरात न्यायालयाने सुनावली होती दोन वर्षांची शिक्षा

मोदी आडनावाची मानहानी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा :विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी भाजपाकडून तपास यंत्रणेचा गैरवापर – अनिल परब

राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बी. आर. गवई, जस्टिस पी. एस. नरसिंहा आणि जस्टिस संजय कुमार यांच्या पीठाने सुनावणी केली. राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला तर दुसऱ्या बाजूने महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.