बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती.आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. आता नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :“आजचा निकाल म्हणजे संविधानाचा…”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा :सर्वोच्च न्यायालयाकडून ‘मोदी आडनाव’ खटल्यात राहुल गांधींना मोठा दिलासा
नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांच्या आरोपावरून पाचही जणांविरुद्ध कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :आजपर्यंत भारतीय मुस्लिमांचा हिरो औरंगजेब कधीही नव्हता, देवेंद्र फडणवीसांचं विधान
दरम्यान, नितीन देसाई यांच्या कंपनीवर कर्ज होतं. नोव्हेंबर २०१६ मध्ये नितीन देसाई यांच्या कंपनीने एडलवाईस एआरसीकडून १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये ईसीएल फायनान्सकडून पुन्हा अतिरिक्त ३५ कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले. जानेवारी २०२० पासून कर्जाचे हप्ते थकू लागले. त्यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यासाठी जुलै २०२२ मध्ये एनसीएलटीकडे याचिका करण्यात आली होती, असं एडलवाईस एआरसीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं होतं