Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रतिसृष्टी उभारणार्‍या आधुनिक विश्वकर्माची शोकांतिका

0

सचिन अपसिंकर –

नितिन चंद्रकांत देसाई हे नाव आज काळाच्या पडद्या आड गेल असलं तरी त्यांनी चंदेरी दुनियेतील रुपेरी पडद्यावर उभारलेली प्रतिसृष्टी चिरंतन राहील. महाभारतामध्ये मयासुराने उभारलेल्या लाक्षागृहा मध्ये अभासी जग होत नितिन देसाई सुद्धा असेच आधुनिक युगातील विश्वकरमच होते. दूरचित्र वाहिन्या असोत. किंवा मराठी हिंदी चित्रपट जगत असो अनेक संसृतिक कार्यक्रम असोत जेथे नितिन देसाईंचे कलादिग्दर्शन असायचे तेथे विषय आशय अनुरूप विश्व उभारण्याची त्यांची कलदृष्टी ही अवर्णनीयच होती. मोहमई दुनिया वसवताना मग ते पौराणिक असो किंवा आधुनिक सर्वच पार्श्वभूमी जीवंत करणे हे त्यांचे वैशिष्ठ होत. लगाणचा ब्रिटिश काळ जोधा अकबरचा समकालीन इतिहास देवदासचे राजवैभव बाजीराव मस्तानीच लावण्यामय जग अशी अनेक उद्धाहरणे आहेत जिथे चित्रपटाच्या कथावास्तु, अभिनय, गीते, संगीत, या बाबींबरोबरच नेपथ्यामद्धेही प्रेक्षक देहभान हरपून मंत्रमुग्ध होत असत प्रतिसृष्टी निर्माण करायला असामान्य प्रतिभा लागते. अहोरात्र परिश्रम घ्यावे लागतात. नवनिर्माण क्षमता तर आवश्यक असतेच पण त्याच बरोबर वेळ श्रम पैसा यांची दीर्घ काळ गुंतवणूक करावी लागते. यासर्वांसाठी व्यवस्थापन कौशल्य लागते. त्याच बरोबर निरीक्षण शक्ति चौफेर वाचन संधर्भग्रंथांच मुलभूत अवलोकन आणि चिंतन लागतं. नितिन देसाईकडे हे सर्व होत. त्यांनी स्वताला सिद्ध केल होत. शेकडो चित्रपट त्यांनी हाताळले देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये त्यांनी तयार केलेले चित्ररथ चमकले लालबागच्या राजालाही त्यांनी नेपथ्यरूपी दूर्वाची जुडी वाहिली. राजा शिव छत्रपती मालिकेत त्यांनी शिवकालीन इतिहास जीवंत केला. कर्जत जवळ पंचावन्न एकरात देसाईनी भव्य स्टुडिओ उभारला स्थानिक ग्रामस्थानाच त्यांनी रोजगार दिला. ५२ माणसांचा कुटुंब त्यांनी कायम सांभाळल त्यांचाकडे काम करणार्यात प्रत्येक व्यक्तीचे पालक झाले होते. सर्वांच्या सुखदुखात एकरूप होण हा त्यांचा स्वभाव होता. देसाईंनी आपली कारकीर्द अतिशय समर्पणातून घडवली होती त्यांना पैसा, प्रसिद्धी, किर्ति, सन्मान सर्वकाही मिळाले होते. त्यांच्या योगदनामुळे त्यांना शासकीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यांनी अगदी या विश्वात आपल अधिराज्य गाजवल अस नक्कीच म्हणता येईल.

दोन दिवसांपूर्वी देसाई यांनी अगदी विचारपूर्वक स्वताला संपवलं. त्यांनी या जगाचा निरोप घेताना आपली कैफियत ध्वनिमुद्रित केली देसाई आर्थिक विवंचणे मध्ये होते. आणि हातबल, असहाय आगतिकतेमधून देसाईनी अतिशय थंड डोक्याने हे जग सोडलं. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्व मनोगता मध्ये हा स्टुडिओ हे एका मराठी माणसाचं स्वप्न होत आणि त्याच शासनाने संवर्धन कराव अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता त्यांचा आत्महत्तेचा पोलिस तपास सुरू आहे. देसाईंच म्हणणं ही त्यांची व्यथा होती. ते सर्व कर्ज प्रकरण पडताळले जाईल त्यांच्या या आत्मघाताला कर्णीभूत असणार्याी व्यक्ति, वित्तसंस्था प्रशासनातले घटक यांच्यावर कारवाही होईल. गुन्हे दाखल होतील कदाचित त्यांना शिक्षा होईल पण देसाईंच्या या आत्महत्ते मुळे निर्माण झालेल्या काही प्रश्नाची उत्तरे मिळाली पाहिजेत. कलावंताला संवेदनशीलतेचा अभिशाप असतो. जेव्हा त्यांच्या कलावृत्तीला चिरडून टाकणारे प्रसंग या भौतिक जगात घडतात. तेव्हा ते ऊनमळून पडतात देसाई हे हाडाचे कलावंत होते. तंत्रज्ञान कितीही विकसित झालेल असुदेत पण जेव्हा देसाई ही प्रतिसृष्टी निर्माण करायचे तेव्हा त्यांच्या मधल्या कलावंत फुलत होता देसाईंच नेपथ्य केवळ साहित्याचा डोलारा नव्हता ती केवळ यंत्र सामुग्रीची कृत्रिम कसरत नव्हती तर त्याकामात देसाईंचा आत्मा रममाण झाला होता त्यामुळे देसाईंच्या भावसृष्टीवर झालेला प्रत्येक अर्थ दृष्टीचा आघात हा त्यांना कणाकणाने खचवत ढासळवत गेला.

देसाईंच्या मृत्यू नंतर त्यांचं कलादालन संवर्धन करण्याबाबद राज्यशासन सकारात्मक असल्याच उपमुख्यमंत्र्यांनी विधिमंडलात सांगितलय पण देसाईसारख्या कलावंताची ही शोकांतिका घडवून अनन्यासाठी काही पाठपुर वठा दारांनी त्यांना वेठीला धरलं होत का याच उत्तर मुळ्यालाच हवं तसेच सुशांतसिह राजपूत प्रमाणेच देसाईंनाही कामे मुळूनयेत या साठी बॉलिवूड मधली एक लॉबी प्रयत्न शील होती या प्रवादा ची चौकशी झाली पाहिजे. कलावंत घडताना अथक तपश्चर्या केलेली असते. त्यामुळे कलावंताच संपन हे अपरिमित नुकसान असतं ज्या महाराष्ट्रात जन्मलेल्या दादासाहेब फळकेंच्या नावाने दिल्लीत राष्ट्रपाती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतात त्या राज्यातील मराठी माणूस आणि कलावंत आर्थिक संकटामुळे आपली इहलोकीची यात्रा संपावतो या सारखा दैव दुर्विलास नाही. कलावंतांना नकली लोकाश्रय आणि पोकळ राजाश्रय मिळणार्याी राज्यातली कलासंस्कृती हळूहळू मृतप्राय होत असते हे कटू सत्य आहे. त्यामुळे कलावंताच्या पाठीशी समाजाने उभ रहायला हव भाकरीचा चंद्र शोधण्यात आयुष्य बरबाद होणार्या कलावंताच हे मरण वेदनादायी आहे. पुन्हा नव्याने देसईसार्ख जाणं कोणाही कलावंताच्या वाट्याला येऊ नये. येवढीच अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.