Latest Marathi News

BREAKING NEWS

सचिन पायलट काँग्रेसमध्येच हा मराठीं चेहरा ठरला गेम चेंजर…..!

0

मुंबई : राजस्थान काँग्रेस मध्ये बंडाचे शिंख फुकून काँग्रेस विरोधात भूमिका मांडणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपले बंड मागे घेतले आहे. काल त्यांनी काँग्रेस नेते राहून गांधी आणि प्रियांका गांधी वाडरा यांची भेट घेऊन चर्चा केल्यनानंतर आपले बंड मागे घेत असल्याचे घोषित केले. पायलट यांच्या घोषणेनंतर हा राजस्थामध्ये भाजपाला मोठा धक्का मनाला जात आहे.

मात्र सचिन पायलट यांचे बंड मागे घेण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून समजले जाणारे महाराष्ट्रातले राजीव सातव यांनी या प्रकरणात प्रमुख भूमिका निभावलेली आहे. सचिन पायलट यांनी बंड करताच राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना पायलट यांची समजूत काढण्यासाठी राजस्थानला पाठवले होते. तसेच ते यशस्वी सुद्धा झाले आहेत.

राजीव सातव हे सतत सचिन पायलट यांच्या संपर्कात होते. काँग्रेस पक्ष आणि पायलट यांच्यातील ते दुवा होते. सचिन पायलट यांनी बंड करताच राहुल गांधी यांनी सातव यांना राजस्थानला रवाना होण्याचे आदेश दिले आणि त्यांनी आपली कामगिरी सफल करून दाखवली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.