मुंबई : कोव्हिड 19 ने जगभरात अनेक जणांचे प्राण घेतले आहेत. अशातच गजल प्रेमींवर शोककळा पसरणारी बातमी आलेली आहे, प्रख्यात गजलकार, शायर, डॉ.राहत इंदोरी यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. राहत इंदोरींच्या निधनाने शायरी जगतावर शोककळा पसरली आहे.
काल कोव्हिड 19 ची प्राथमिक स्वरूपाची लक्षणे दिसल्याने त्यांना इंदोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही महिती दिली होती. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्याने राहत इंदोरी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे.
राहत इंदोरी यांचा जन्म 1 जानेवारी 1950 साली, मध्यप्रदेशातील इंदोर येथे झाला. आपल्या गजल, नज्म, गीते यांच्या माध्यमातून गेली कित्येक दशके त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, अगदी आजही टिकटॉक सारख्या नवीन प्लॅटफॉर्म वर व्हायरल झालेला त्यांचा शेर
‘बुलाती है मगर जाने का नई,
ये दुनिया है इधर जाने का नई’
मिम्स बनेपर्यंत व्हायरल झाला.
राहत इंदोरी यांनी ‘रुत’ ‘दो कदम और सही’ ‘धूप बोहोत है’ ‘चाँद पागल है’ ‘मोहजूद’ ‘नाराज’ अशी त्यांची सहा पुस्तके आहेत, भारतात काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असा कोणता जिल्हा नसावा जिथे राहत इंदोरी यांचा मुशायरा झाला नसावा, देशाबरोबर परदेशात देखील त्यांनी भारताचे आणि उर्दूचे नाव मोठे केले. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुलांचा परिवार आहे.
राहत इंदोरी यांचे काही निवडक शेर
” मत पुछो के रुमाल के पिछे क्या है
किसीं और दिन ये सैलाब दिखाएंगे तुम्हे”” ये अलग बात की खामोश खड़े रहते है
फिर भी जो लोग बड़े है वो बड़े रहते है
ऐसे दरवेशोंसे मिलता है हमारा शिजरा
जिनके जूतोंमें कई ताज पड़े रहते है”” दिल धड़कने का तसब्बुर भी ख्याली हो गया
एक तेरे जाने से सारा शहर खाली हो गया”“अपने हाथोंको तू पतवार भी कर सकता है
हौसला है तो नदी पार भी कर सकता है
एक सियासत है जो इनाम भी दे सकती है
एक कलंदर है जो इनकार भी कर सकता है”“लोग हर मोड़पे रुक रुक के संभलते क्यों है
इतना डरते है तो घरसे निकलते क्यों है”” तेरी हर बात मुहोब्बत में गवारा करके , दिलके बाजार में बैठे है खसारा करके, आते जाते रहते है कई रंग मेरे चेहरेपर, लोग लेते है मजा जिक्र तुम्हारा करके”
“जनाजेपर मेरे लिख देना यारो
मुहोब्बत करनेवाला जा रहा है….”
विश्वनाथ घाणेगांवकर