Latest Marathi News

BREAKING NEWS

सेनेपेक्षा राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची कामे जलद, सेना आमदारांची तक्रार….!

0

मुंबई : शिवसेना आमदारांपेक्षा राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची काम जलद होतात अशी तक्रार सेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. काल मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत झालेल्या सेना आमदारांच्या बैठकीत सर्व आमदारांनी हा मुद्दा मांडला असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खाते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांची कामे पटापट होतात, असा दावा सेना आमदारांनी केला आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळत नसल्याची खंत आमदारांनी या बैठकीत मांडली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच वायकर यांच्यावर सेना आमदारांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहे. या मागण्याचा सातत्याने पाठपुरावा व्हावा आणि शक्य ती कामं लवकरात लवकर व्हावी असा या मागील उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.