मुंबई । शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या पाच खासदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. या पाचही खासदारांनी व्हीप पाळला नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. शेवाळे यांच्या या विधानानंतर ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
राहुल शेवाळे यांच्या या विधानानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. शिरसाट यांनी थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. कोव्हिड घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष दिली आहे. ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतला. मला धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचं सुजीत पाटकर यांनी म्हटलं आहे.
याबाबत संजय शिरसाट यांना माध्यमांकडून विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मोठे बॉम्बच टाकले. तुम्हाला उगाच चौकशीसाठी बोलावलं का? उगाच कस्टडीत घेतलं का? मारून आरोप सिद्ध करता येत नाही. तुमच्याकडे कागदपत्र असेल गुन्ह्यात अडकला असेल तरच शिक्षा होते, असं संजय शिरसाट म्हणाले. आता सिरसाठ यांच्या या विधानावर ठाकरे गट काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.
‘राहुल गांधींपेक्षाही मूर्खपणा अमित शाह यांचा’ शिंदे गटाच्या या मित्रपक्षांच्या टोला
अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा ‘तो’ किस्सा