Latest Marathi News

BREAKING NEWS

“शब्दरंग” दालनाचा 13 ऑगस्ट रोजी शुभारंभ !

0

बार्शीच्या साहित्य-सांस्कृतिक विश्वातील अभिनव उपक्रम.

बार्शी (प्र) : बार्शीच्या साहित्य-संस्कृती जगतामध्ये शब्दरंग दालन या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ दिनांक 13 ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी 11 वाजता श्री शिवाजी कॉलेज जवळ, शिवाजीनगर,बार्शी येथे होत आहे अशी माहिती भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर चव्हाण यांनी दिली.

यावेळी चव्हाण म्हणाले, या उपक्रमा अंतर्गत रसिका कट्टा, शब्द संवाद, पुस्तक गोष्ट, व्यक्ततेची बाराखडी, लेखक आपल्या भेटीला, जाऊ कवितांच्या गावा, ई. वाचन प्रेमींसाठी ग्रंथालय व विविध संस्कृतीक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे या उपक्रमाचा शुभारंभ सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने, सिने व नाट्य अभिनेते संजय क्षेमकल्याणी, प्रसिद्ध लेखक हेमंत ऐदलाबादकर, ठाण्याचे तहसीलदार विशाल इंदुलकर, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, माजी सनदी अधिकारी दीपक नलवडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन सौ. सुनीता गाडेकर कार्याध्यक्ष व श्रद्धा धर्माधिकारी संचालिका, शब्दरंग यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.