काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी जीवानिशी संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. आमदार राठोड हे महाराष्ट्र विधान परिषदेवर काँग्रेसच प्रतिनिधीत्व करतो. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आहे. राजेश राठोड असं या आमदाराच नाव आहे. नाशिक-पुणे मार्गावर राजेश राठोड यांच्या गाडीवर वर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. ते मुंबईहून जालन्याकडे चालले होते. त्यावेळी त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. वेल्हे ते पिंपळनेर भिवंडी हद्दीत ही घटना घडली.
या सद्नर्भात बोलताना राठोड म्हणाले की, “मुंबई येथून नाशिकमार्गे औरंगाबाद-जालना प्रवासाला सुरुवात केली. वेल्हे ते पिंपळनेर दरमयान ट्रॅफीक जाम असतं. वाहनामध्ये असताना, एका मोठा टँकर ट्रक त्याचा नंबर संबंधित पोलिसांना देणार आहे. अचानक भरधाव ट्रक माझ्या गाडीवर चालून आला. पाच ते सहा मिनिटाचा पाठलाग करुन गाडी आडवी लावून उभी केली.
तेव्हा समजलं की, तो साधा प्रवास करणारा ट्रक नव्हता. त्याच्या बोलण्यातून शंका आली. गेल्या काही दिवसापासून धमक्या येत आहेत. मला घातपाताची शक्यता वाटते. पोलीस, सरकार, गृहविभागाने ताताडीने चौकशी करावी, याची अधिकची माहिती मी द्यायला तयार आहे, सरकारने तातडीने उपायोजना करणं आवश्यक आहे” असं आमदार राजेश राठोड म्हणाले. राठोड हे काँग्रेसचे युवा आमदार आहेत. ते जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.
ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगात जाणार; आमदार संजय शिरसाट यांचं मोठं विधान
‘राहुल गांधींपेक्षाही मूर्खपणा अमित शाह यांचा’ शिंदे गटाच्या या मित्रपक्षांच्या टोला