मुंबई : एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडली तेव्हा मित्रपक्ष असलेल्या प्रहार संघटनेने अर्थात बच्चू कडू यांनी सुद्धा शिंदे सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र मंत्री पदाचे गाजर मिळत असल्यामुळे कडू यांनी थेट शिंदे फडणवीस सरकार विरोधात बंद पुकारले होते अशातच आता आमदार बच्चू कडू यांनी थेट अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. कलावतीच्या मुद्यावरुन बच्चू कडू यांना शाह यांना लक्ष्य केलं.
यवतमाळच्या कलावतीच्या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी राहुल गांधीं यांच्यासह अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कलावती यांच्या बाबतीत पाहिला मूर्खपणा राहुल गांधींनी केला आहे. आता त्यापेक्षाही मूर्खपणा अमित शहा यांनी केला. अमित शाह लोकसभेत जे काही बोलले, ते सर्व खोटे बोलले अशी टीका बच्चू कडू यांनी केली होती.
अमित शाह यांनी एवढं मोठ बोलताना विचारपूर्वक बोलायला पाहिजे होतं. अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत येत आहे. प्रत्येक गोष्ट भाजप खोट बोलते असा प्रचार झालेला आहे” असं बच्चू कडू म्हणाले. ‘कलावतीच्या विषयावर अमित शाह यांनी खोटं बोलण हा चिंतेचा विषय आहे’ असे बच्चू कडू यांनी सांगितलं.
“एका कलावतीला घर बांधून देऊन वीज देऊन राहुल गांधी यांनी देखावा केला, तेव्हा तुमचं सरकार राज्यात केंद्रात, होतं तर धोरण आखायला पाहिजे होत. एका कलावतीला घर देणं हे चुकीच आहे. कोट्यावधी लोक एका बाजूने घरासाठी रांगेत उभे असताना एका व्यक्तीच्या घरी जाऊन जर राजा उदार होत असेल तर बाकी लोकांना भोपळा देत असेल तर त्याला त्याला आमचा विरोध आहे” असं बच्चू कडू म्हणाले.