Latest Marathi News

BREAKING NEWS

अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा ‘तो’ किस्सा

0

केदार दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री वंदना गुप्ते सध्या चर्चेत असून या चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. वंदना गुप्ते या नेहमीच मोकळेपणानं बोलताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका कार्यक्रमात वंदना गुप्ते यांनी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत आलेला एक अनुभव सांगितला आहे.

सुरुवातीला वंदना गुप्ते यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रिचा एक अनुभव सांगितला आणि त्यानंतर एकदा राज ठाकरे यांनी वंदना गुप्ते यांना त्यांच्याच नव्या गाडीतून खाली उतरवलं आणि त्यांच्या गाडीचं प्लास्टिक हाताना काढलं याविषयी सांगितलं आहे. वंदना गुप्ते यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. अवधूत गुप्ते यांच्या या कार्यक्रमात वंदना गुप्ते मोकळेपणानं बोलताना दिसल्या. त्यांच्या या कार्यक्रमात वंदना गुप्ते यांनी अनेक गोष्टींविषयी सांगितलं.

यावेळी अवधूत गुप्ते वंदना गुप्ते यांना प्रश्न विचारत म्हणतात की राज ठाकरेंनी गाडी थांबवून तुमच्या गाडीचं प्लास्टिक फाडलं होतं? त्यावर उत्तर देत म्हणाल्या की ‘मी नवीन गाडी घेऊन त्या गल्लीतून येत होते आणि राज नेमका तिथे फेऱ्या मारत होता. ही चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तर नवीन गाडी म्हटल्यावर सीटवर, फ्लॅपवर प्लास्टिक असतंच ना… मी काय ते काढलं नव्हतं. मी गाडी घेऊन येत होते. मला बघून तो म्हणाला, ‘उतर पहिले त्या गाडीतून.’

त्यानंतर पुढे काय झालं हे सांगत वंदना गुप्ते म्हणाल्या, राजनं मला उतर म्हटल्यानंतर मी त्याला म्हटलं अरे का पण? तर तो म्हणाणा, इथे मराठी माणूस दिसतो. कशाला ते प्लास्टिक ठेवायचंय? कशाला वाचवायचंय, कुठे काही डाग पडेल याची भीती वाटते का तुला? असं विचारलं. मग त्याच्या या प्रश्नावर मी म्हटलं की, अरे घरी जाऊन काढते. तर त्याने ऐकलं नाही. सरळ गाडीची काच खाली करायला लावली आणि फ्लॅपवरचं प्लास्टिक फराफरा ओढून फाडून टाकलं.

किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढणार; ईडीने मागवले कोविड घोटाळ्यासंबंधित कागदपत्र

सचिन तेंडुलकर विरोधात बच्चू कडू मैदानात; प्रहार स्टाईलनं करणार घरासमोर आंदोलन

Leave A Reply

Your email address will not be published.