नवी मुंबईत पीएसआय आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. आमच्यातील काही कलाकृती काहीजणांनी विकत घेतल्या हे खरे आहे. मात्र, कलाकार जागेवर असल्याने कलाकृती निर्माण करण्याचा प्रश्न पडला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :नेहरूंना हिंदुस्थानाप्रती कोणतेही प्रेम नव्हते;संभाजी भिडेंचं आणखी एक वादग्रस्त विधान
हेही वाचा : सुषमा अंधारेंच्या टीकेनंतर ‘या’ व्यक्तीने शरद पोक्षेंना म्हटलं माथेफिरु!
उद्धव ठाकरे म्हणाले, “वडिलांकडून मला कलेचा वारसा लाभला आहे. पूर्वी एका मुलाखतकाराने माझी मुलाखत घेतली होती. तेव्हा ‘बाळासाहेब ठाकरे हे राजकीय नेते आणि व्यंगचित्रकार आहेत. तर, त्यांच्याकडून कोणता वारसा घ्याल?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी क्षणाचाही विलंब न लावता कलेचा वारसा, असं म्हटलं होतं. तर, समोरचा व्यक्ती अवाक झाला.”
हेही वाचा : महात्मा गांधींबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य विरोधात संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल
“कला ही रक्तात असावी लागते. आपण कलाकृती विकत घेऊ शकतो. म्हणून आमच्यातील कलाकृती काहीजणांनी विकत घेतल्या, हे खरे आहे. पण, कलाकार जागेवर असल्याने कलाकृती निर्माण करण्याचा प्रश्न पडला नाही. आणखी कलाकृती निर्माण करू. पाहिजेल तर प्रदर्शन करतो आणि विकत घ्या, असं म्हणतो,” अशी टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.