अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नखाएवढेही योगदान नाही. मात्र कोणतेही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले, अशी टीका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी येथे केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, यवतमाळ विभागाच्या वतीने आज शनिवारी स्थानिक बलवंत मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
हेही वाचा :सुषमा अंधारेंच्या टीकेनंतर ‘या’ व्यक्तीने शरद पोक्षेंना म्हटलं माथेफिरु!
हेही वाचा : महात्मा गांधींबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य विरोधात संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल
शुक्रवारी अमरावती येथे महात्मा गांधींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संभाजी भिडे आज यवतमाळात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी आजच्या व्याख्यानात महात्मा गांधींसंदर्भात भाष्य करणे टाळले. त्याऐवजी व्याख्यानाच्या ओघात अखंड हिंदुस्थानाच्या प्रेमावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य केले. नेहरूंना हिंदुस्थानाप्रती कोणतेही प्रेम नव्हते. देशासाठी नेहरूंचे नखभरही योगदान नसताना ते पंतप्रधान झाले, याचे शल्य त्यांनी व्यक्त केले.