Latest Marathi News

BREAKING NEWS

निजामाने इंग्लडच्या बँकेत ठेवलेले पैसे मराठवाड्याच्या विकासाला द्या….!

0

औरंगाबाद : मराठवाड्याच्या निजामाने प्रांतात आपले वर्चस्व असताना मराठवाड्याच्या हिस्याचे २६५ कोटी इंग्लंडच्या बँकेत ठेवले होते. आता ते पैसे पुन्हा मराठवाड्याच्या विकासाला मिळावे म्हणून मराठवाडा जनता विकास परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मली सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर ह्यांना निवेदन पाठवले आहे.

मराठवाडा विदर्भ स्वातीनंतर होऊन भारतीय स्वतंत्रता सामील होण्यापूर्वी मराठवाड्यातील अनेक भाग हा निजामाच्या शासनाखाली येत होता. देश स्वतंत्र होऊन मराठवाडा भारतीय संघराज्यात सामील होण्यापूर्वी हैद्राबादच्या निजामाने सप्टेंबर १९४८ रोजी इंग्लंडमधील पाकिस्तानचे तत्कालीन राजदूत हबीब इब्राहिम रहमतुल्ला यांना नॅशनल वेस्टमिनिस्टर बँकेत भरण्यास सांगितले होते.

सदर रक्कम आता ३५ दशलक्ष डॉलर एवढी झाली आहे. या रकमेवरती मराठवाड्याचा संपूर्ण अधिकार आहे. त्यामुळे ही रक्कम मराठवाड्याला मिळवून द्यावी अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

मराठवाडा हा जुन्या हैदराबाद संस्थानचा मोठा भाग होता. त्यामुळे वेस्टमिनिस्टर बँकेतील या रकमेवर मराठवाड्याचा पहिला हक्क पोहोचतो. म्हणून ही रक्कम मराठवाड्याच्या आरोग्य, शिक्षण, रस्ते, रखडलेले सिंचन प्रकल्प अशा विकास कामासाठी उपलब्ध व्हावी अशी भूमिका घेऊन मराठवाडा जनता विकास परिषदेने घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.