मुंबई: राज्यता विशेष करून मुंबईत कोरोना रुग्णाच्या संख्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता कोरोनाने पुढाऱ्यांच्या दारपर्यंत पोहचला आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणखी एक कार चालक कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. यासह राज ठाकरे यांच्या एकूण ७ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले होते. यानंतर त्याचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजमध्ये घरकाम करणाऱ्या सेवकालाही कोरोनाचा संसर्ग झाला.
राज ठाकरे यांच्या दोन चालकांनाही कोरोनाची लागण झाली. आता पुन्हा एकदा आणखी एका चालकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. यासह राज ठाकरेंच्या आजूबाजूला कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आता ७ वर पोहचली आहे.