मुंबई: सध्या मुंबई शहरा पाठोपाठ नवी मुंबई शहरात सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्नांच्या संक्रयेत वाढ होताना दिसत आहे. तब्बल एका दिवसात २०० च्यावर रुग्ण आढळून आले आहे. शहरात २४ जून रोजी एका दिवसात तब्बल ३२१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
शहरात जाहीर केलेला लॉकडाऊन सात दिवसाचा असणार आहे. यात ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये २९ जूनपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार असून कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. नवी मुंबईत नेरुळ, ऐरोली, कोपरखैरने, घणसोली हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.