Latest Marathi News

BREAKING NEWS

लायन्स क्लब बार्शी टाउन तर्फे वैद्यकीय उपकरण बँकचे उद्घाटन संपन्न..

0

बार्शी |

दिनांक २७ जून रोजी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, लायन्स क्लबचे प्रांतपाल राजशेखरजी कापसे व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी. वाय. यादव यांच्या हस्ते लायन्स क्लब बार्शी टाउन व श्री महावीर धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमानाने बार्शी येथील देवणे गल्लीत याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

बार्शी ही मेडिकल हब म्हणून नावारूपास आलेले एक शहर आहे. कोरोना काळामध्ये उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, बीड या आसपासच्या जिल्ह्यातून नागरिक येथे उपचारास आले होते व आत्ताही येत आहेत त्यामध्ये लायन्स क्लब बार्शी टाउन यांच्यावतीने गेली २५ वर्ष बार्शी मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात काळाची गरज व पेशंटला लागणारे महागडे साहित्य म्हणजे व्हीलचेअर, फोल्डेबल बेड ,एअर बेड, वॉटर बेड ,वॉकर अशा ह्या अनेक वस्तू पेशंटला तो बरा होईपर्यंत कमी कालावधीसाठी लागतात या सर्व वस्तू खर्चिक असल्यामुळे तसेच पेशंट बरा झाल्यानंतर त्या घरामध्ये अडगळीच्या ठरत असताना या सर्व वस्तू महावीर धर्मार्थ दवाखाना येथे ठेवण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये या वरील सर्व वस्तू नाममात्र भाडे तत्त्वावर गरजू पेशंटला देण्यात येणार आहेत तरी बार्शी तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.अमित कटारिया यांनी केले आहे.तसेच ज्या नागरिकांकडे यातील वस्तू आपल्या घरात आडगळीच्या ठरत असतील व त्या सुस्थितीत असतील तर ते देणगी स्वरूपात स्वीकारल्या जातील असे आव्हान अध्यक्ष अमित कटारिया व महावीर धर्मार्थ दवाखान्याचे अध्यक्ष सचिन ललवाणी यांनी केले आहे.

तसेच लायन्स क्लब बार्शी टाउन ने प्रसन्नदाता गणपती मंदिर ट्रस्ट संचालित मोक्षधामला शव शितपेटी प्रदान केली आहे.कोणाकडे मृत्यू झाला व नातेवाईक दुरून येणार असल्यास बॉडी तशी ठेवणे शक्य नसते, यासाठी या शवगार पेटीचा उपयोग होतो.

संपर्क : ९०७५०८१४४६/ ७०२०४३३९८५

Leave A Reply

Your email address will not be published.