बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आता त्यापाठोपाठ ईडीने देखील लक्ष घातले आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या ईडीच्या रडारावर आल्या आहेत. पेडणेकर यांच्यावर सुरू असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे ईडीने मागवल्याचे माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनीनुसार ईडीने काल मुंबई पोलिसांकडून यासंबंधीचे कागदपत्रे मागवली आहेत. काही दिवसांपूर्वी बॉडी बॅगचा घोटाळा झाल्यासंदर्भात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याच धर्तीवर ईडी किशोरी पेडणीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोरोना काळात बॉडी बॅग विकत घेताना जास्त दराने खरेदी झाल्याचा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. त्यानंतर आता ईडीने या प्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्रे मागवल्याने चर्चेला उधाण आलं आहे. ईडीने कोविड घोटाळ्याची चौकशीदरम्यान बॉडी बॅग घोटाळ्याचा उल्लेख केला होता.
या घोटाळ्यामध्ये १७०० ते १८०० बाजारमुल्य असलेल्या बॉडी बॅग साडेसहा हजार ते ६८०० रुपयांनी विकत घेतल्याचा आरोप आहे.मृत कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग दोन हजारांऐवजी ६८०० रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सचिन तेंडुलकर विरोधात बच्चू कडू मैदानात; प्रहार स्टाईलनं करणार घरासमोर आंदोलन
मनसेच्या आंदोलनाला यश । २४ तासाच्या आत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या फलकाची बंद लाईट सुरु