Latest Marathi News

BREAKING NEWS

सचिन तेंडुलकर विरोधात बच्चू कडू मैदानात; प्रहार स्टाईलनं करणार घरासमोर आंदोलन

0

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी दंड थोपाटले आहेत. सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सचिन यांच्या घरासमोरच प्रहार स्टाईलने आंदोलन केलं जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

तसेच सचिन यांनी या जाहिरातीतून माघार घ्यावी म्हणून बच्चू कडू यांनी सचिन यांना 15 दिवसाचा अल्टिमेटमही दिला आहे. आता या अल्टिमेटमुळे काही काळ सचिन तेंडुलकर विरुद्ध प्रहार असा सामना रंगलेला पाहायला मिळणार आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना कडू यांनी आपली भूमिका मांडली आहे.

कडू म्हणाले की, सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमबाबतचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ते भारतरत्न आहेत आणि भारताचे अभिमान आहेत. त्यांनी या ऑनलाईन गेममध्ये चुकूनही त्यांचा फोटो असलेले कुठे पोस्टर वगैरे आहे की नाही हे तपासलं पाहिजे. तसेच त्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ही आमची विनंती आहे. ते नाही झालं तर आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

आम्ही सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू शकतो. भारतीयांची ऑनलाईन गेमपासून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपान देऊ. नारळ देऊ. त्यांना नारळ देऊन त्यातून बाहेर निघण्याची विनंती करू. आमचं आंदोलन नेहमी अनोखं असतं. यावेळीही तसेच असेल. आम्ही सचिन तेंडुलकर यांना नारळपान देण्याचं आंदोलन करणार आहोत. लोकं सुपारी घेतात, तुम्ही नारळ घ्या. असं कडू यांनी म्हंटल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.