मुंबई । छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून अंधारातील जनतेला प्रकाशात आणले, त्यांच्या नावावर आपण राजकारण करतो पण त्यांच्याच नावाचा फलक अंधारात आहे याकडे कोण लक्ष्य देणार का ❓ असा सवाल मनसे विभाग अध्यक्ष चेंबूर विधानसभा श्री. माऊली थोरवे यांनी उपस्थित करत चेंबूर पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या बंद लाइट संदर्भात थेट स्थानिक लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाला जाब विचारला होता .तसेच २४ तासांचा अल्टिमेट दिला होता.
आता मनसेच्या या इशाऱ्यानंतर २४ तासांच्या आत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळी लाईट दुरुस्त करून पुर्वव्रत सुरु करण्यात आली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना निवडणुकीच्या वेळीचा फक्त महाराज आठवतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र दुसरीकडे सदर लाईट बंद असल्याचे निदर्शनास येताच या विरोधात मनसे या एकमेव पक्षाने आवाज उठवला होता.
तसेच सदर लाईट सुरु केल्यानंतर मनसे विभाग अध्यक्ष चेंबूर विधानसभा श्री. माऊली थोरवे यांनी मुंबई महानगर पालिकेचे आभार मानले आहे. मात्र आंदोलन केल्यानंतर हे बदल दिसून येणार आहेत का? आपली पण लक्ष्य ठेवण्याची जबाबदारी नाही का ❓️भविष्यात अशा घटना घडू नयेत याबाबत प्रशासनाने काळजी घ्यावी ही अपेक्षा! अशी सूचना वजा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.
शेवटी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडे आमदार किती? हेच शरद पवार यांचं राजकारण? मनसेचा टोला
‘अक्षय कुमरला जो घालेल चपलची माळ त्याला 10 लाख देणार’, नेमकं काय आहे प्रकरण ?