Latest Marathi News

BREAKING NEWS

‘आरे’च्या निर्णयावर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आरे मधील ६०० एकर जमीन जंगल म्हणून काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केली आहे. या संदर्भात आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत निर्णयाचे स्वागत केले.

मागच्या सरकारच्या कार्यकाळात आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आली होती या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी तसेच तत्कालीन विरोधी पक्षाने विरोध दर्शल होता. भाजपाने तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला डावलून प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता.

मात्र आघाडी सरकार आल्यावर आरे’ मधील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याची चर्चा सुरू झाली  आणि काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. ‘मित्रहो… आम्ही दिलेला शब्द जपला… ‘आरे’चे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्यासह अनेक जणांनी आंदोलने केली. तुरुंगात गेले, पण तत्कालीन सरकार बधले नाही. परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला,’ असे ट्विट आव्हाडांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.