Latest Marathi News

BREAKING NEWS

विरोधकांनी संयम सोडून महाराष्ट्राचे अहीत करू नये – संजय राऊत

0

मुंबई : सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

विरोधकांनी घंटानाद आंदोलन करत महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्याची मागणी गेली होती. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील पंढरपुरात जाऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्याची मागणी केली होती. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील मशिदी आणि धार्मिकस्थळे उघडण्यासाठी सरकारवर दबाव आणला होता.

प्रेस कोन्फरन्समध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी आपल्या शैलीत सर्वांना उत्तर दिले आहे. सरकारला मंदिरे बंद करण्याची अजिबात इच्छा नाही. मुख्यमंत्र्यांची देखील मंदिरे उघडावी अशीच इच्छा आहे. मंदिरांनी कोरोना काळात अतिशय सहकार्य केले आहे. मात्र सध्या कोरोनाचा आकडा वाढतोय. त्यामुळे विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये.

संभाजी नगरच्या तिरंगी लढतीत अपघाताने निवडून आलेले खासदार अनेक मागण्या करत आहेत, मात्र असा अपघात पुन्हा होणार नाही असा टोलाही राऊत यांनी इम्तियाज जलील यांना लगावला. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या नेत्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. विरोधीपक्षाच्या आंदोलनावर राऊत म्हणतात, सर्व विरोधकांनी संयम सोडून महाराष्ट्राचं अहीत करू नये. आणि जनतेचे नुकसान करू नये.

उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नाही या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धत एकच आहे. विरोधकांना इतकाच त्रास होत असेल तर त्यांनी आधी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावी मग उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.