मुंबई : सुशांतसिंह राजपूतचे कथित आत्महत्या प्रकरण सीबीआय कडे जाण्याआधी पासूनच भाजपचे अनेक नेते नाव न घेता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत होते. नारायण राणे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आदित्य ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे स्वतःवर लागलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले होते. मी बाळासाहेब ठाकरेंचा नातू आहे, त्यांच्या प्रतिमेला धक्का लागेल असं मी काहीही करणार नाही. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र निलेश राणे यांनी ट्विट करत आता नव्या वादाला तोंड फोडले आहे.
सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने काल बॉलीवूड मध्ये सुरु असलेल्या ड्रग्स सेवनाच्या विषयावर भाष्य केले होते. आता या वक्तव्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीसुद्धा ड्रग्स टेस्टची मागणी केली आहे.
‘केवळ रणवीर आणि रणबीरच कशाला? आदित्य ठाकरे यांनीही ड्रग टेस्ट करावी. शेवटी बॉलिवूडमधील अंतर्गत वर्तुळात त्यांचाही वावर असतो, असे ट्विट राणे यांनी कंगनाला टॅग करून केले आहे. काल कंगनाने रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांनी ड्रग टेस्ट करून घ्यावी, अशी मागणी तिनं केली होती. हे चौघे कोकेनच्या आहारी गेल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी टेस्ट करून ह्या अफवांना उत्तर द्यावं असे ट्विट कंगनाने केले होते.
Why just Ranveer and Ranbir I feel even Aditya Thakre should undergo random drug test. After all he has also been very cozy with Bollywood’s inner circle.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 2, 2020