Latest Marathi News

BREAKING NEWS

‘इस्रोकडून 200 कोटी मिळणार.. बतावणी करून शेतकऱ्याची चौघांकडून फसवणूक

0

एकीकडे इस्रोचे चांद्रयान ३ च्या यशानंतर कौतुक होत असताना इस्रोचे नाव पुढे करून एका भामट्याने शेतकऱ्यांना चुना लावला आहे. इस्रोच्या यशानंतर त्याच्या लोकप्रियतेचा गैरफायदा देखील घेतला जात असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील एका शेतकऱ्याला चार जणांच्या टोळीने इस्रोच्या नावाने तब्बल 1 कोटींचा गंडा घातला आहे.

एका प्रसिद्ध माध्यमाने दिलेल्या वृतानुसार इंदापूर तालुक्यात राहणाऱ्या एका 40 वर्षाच्या शेतकऱ्याकडे 250 वर्ष जुनं काश्याचं भांडं होतं. या भांड्यामध्ये ‘विशेष विद्युत गुण’ आहेत, आणि यावर प्रयोग करण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि नासा (अमेरिकेची जागतिक प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था) कोट्यावधी रुपये देईल; असं सांगून या शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली.

2014 ते 2018 या कालावधीमध्ये चौघा ठगांनी या शेतकऱ्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. या भांड्यावर वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी पैसे लागत असल्याचं त्यांनी या शेतकऱ्याला सांगितलं होतं. विज्ञानात पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या या शेतकऱ्यानेही पैशाच्या आमिषाला भुलून हे पैसे दिले. यासाठी या शेतकऱ्याने स्वतःची काही जमीन देखील विकली होती.

तब्बल एक कोटींहून अधिक पैसे मिळाल्यानंतर या चौघांनी शेतकऱ्याशी सगळा संपर्क तोडला. त्यांनी याला भेटण्यास किंवा फोन घेण्यासही टाळाटाळ सुरू केली. यानंतर आपल्यासोबत फसवणूक झाल्यांचं या शेतकऱ्याच्या लक्षात आलं. मग त्याने पोलिसांमध्ये धाव घेतली. सध्या या चौघांमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील तपस पोलीस करत आहे.

भाजपच्या मंत्र्याने शिवलिंगाजवळ धुतले हात; टीका होताच म्हणाले की,

लाठीचार्जचे आदेश देणारा कोण? सर्वांची नार्को टेस्ट करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

Leave A Reply

Your email address will not be published.