मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असून झालेल्या लाठीहल्ल्यांनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे अद्यापही मराठवाड्यातील मराठा आंदोलक आरक्षणावर ठाम आहे. जालन्यात आंदोलक उपोषण थांबवण्यास तयार नाही. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शातंतेत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात दगडफेक झाल्याचा दावा करून पोलिसांकडून लाठीमार झाला आणि आंदोलनाला गालबोट लागलं.
यात पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले. ही घटना संतापजनक होती. त्यानंतर आता केवळ त्या भागापुरतं हे आंदोलन मर्यादित राहिलं नसून आता त्याचे पडसाद राज्यभर पसरले आहे. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 लोक आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. अशातच आता विविध विषयावर सतत सखोल लिखाण करणारे अभिनेता किरण माने यांची पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे यावेळी त्यांनी थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा दाखला दिला आहे.
काय म्हंटले आहे पोस्टमध्ये वाचा
माझ्या मराठा बांधवांनो… थेट बोलतो… आपल्याला धर्माच्या नांवावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की ‘एका जातीवर’ झाला असं समजलं जातं. आधी शेतकर्यांवर, मग वारकर्यांवर आनि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुनाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागनार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पायजे.
मनोज जरांगे पाटील…तुमच्याबद्दल काय बोलू? या भाकड काळात तुमी जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो ! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय… रक्त सळसळायला लागलंय… हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकार्यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !’
अशा पोस्टवरनं जे कायम मला ट्रोल करतात त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुनाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्या शेतकर्याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकर्यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असेपर्यन्त बोलत र्हानार.
आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे… न्याय मिळालाच पायजे.
जय शिवराय. जय भीम.
- किरण माने.
एकमराठालाख_मराठा
‘इस्रोकडून 200 कोटी मिळणार.. बतावणी करून शेतकऱ्याची चौघांकडून फसवणूक
भाजपच्या मंत्र्याने शिवलिंगाजवळ धुतले हात; टीका होताच म्हणाले की,