Latest Marathi News

BREAKING NEWS

“मला पुरोगामीत्व शिकवू नका, माझा जन्म…”, छत्रपती संभाजी राजेंची पहिली प्रतिक्रिया

0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांवर दगडफेक केली तसेच त्या परिसरातील वाहनांची जाळपोळही केली. आता याप्रकरणी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी राजे आणि ५०० जणांवर शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याचे रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावर आणि त्याच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलने झाली. मात्र, या आंदोलनाला गालबोट लागले आणि दगडफेक, जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आता याप्रकरणी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत आणि मोठी कारवाई करण्यात आली आहे.

500 जणांवर गुन्हे दाखल कोल्हापूर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. पुण्याच्या रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळोखे यांच्यासह 500 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या जिल्ह्याचे स्थानिक नेता आणि पालकमंत्री मला पुरोगामीत्व शिकवतात, असे संभाजी राजे छत्रपती म्हणाले. संभाजी राजेंनी विचारले की दीड वर्ष हा विषय न्यायप्रविष्ठ नाही, पण तुम्हाला हे कोणी सांगितले? मग परवानगी कशी मिळाली? जिल्हाधिकाऱ्यांना वाटल्यामुळे परवानगी दिली का? पालकमंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलणे योग्य नाही. संभाजी राजेंनी सांगितले की शाहू महाराजांचे पुरोगामीत्व मला शिकवू नका, माझा जन्म त्यांच्या घराण्यात झाला आहे.

विशाळगड येथे घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद झाले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होणार आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असे ट्वीट संभाजी राजे छत्रपती यांनी केले.

नेमकं प्रकरण काय? विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी रविवारी १४ जुलैला पुण्याच्या रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आणि संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड आणि त्याच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलने झाली होती. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांवर दगडफेक केली. तसेच त्या परिसरातील वाहनांची जाळपोळ केली. या प्रकरणी संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्डिंग पाहून गुन्हे दाखल केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.