Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजपच्या मंत्र्याने शिवलिंगाजवळ धुतले हात; टीका होताच म्हणाले की,

0

भारतीय जनता पक्षाचे नेते सतत वादग्रस्त विधाने करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले आह अशातच आता योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सतीश शर्मा यांनी शिवमंदिरात शंकराच्या पिंडीजवळ हात धुतल्याने सोमवारी मोठा वाद निर्माण झाला. शर्मा यांचे हे कृत्य सनातन धर्माच्या विरोधी असल्याचे सांगत काँग्रेस व समाजवादी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.तर दुसरीकडे आपण काहीही केलेल नसून उगाच वाद निर्माण केली जात आहे अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली.

समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे अन्न व नागरी पुरवठामंत्री सतीश शर्मा हे जीतिन प्रसाद या अन्य मंत्र्यासोबत येथील लोधेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी अभिषेकाचा निचरा होण्यासाठी शिवलिंगाजवळ असणाऱ्या ठिकाणी शर्मा यांनी मंदिराच्या पुजाऱ्याच्या साह्याने हात धुतले. या घटनेचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी शर्मा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

यावर काँग्रेसने प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, ‘आपण काय करत आहोत, याचे शर्मा यांनी भान बाळगायला हवे होते. त्यांचे हे कृत्य सनातनविरोधी आहे,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शर्मा यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही शर्मा यांच्यावर टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.