जालन्यातील अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्यासह आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला. या लाठीमाराचे राज्यभरात संतापाची लाट पसरली असून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्याचे आदेश देणारा कोण? असं म्हणत सत्ताधाऱ्यांची नार्को टेस्ट करा, सत्य समोर येईल, असं मोठं विधान विधासभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी थेट नार्कोटेस्ट करण्याचं विधान केल आहे, यावेळी जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जालन्यात पोलिसांनी केलेली लाठीमाराची कारवाई कुणाच्या आदेशाने झाली? SP दोषी आणि DYSP मोकाट कसे? त्यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही? असे अनेक सवाल उपस्थित केले.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली, यासाठी मराठा समाजाला आनंद आहे का? हे ते ठरवतील, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावार लवकर तोडगा काढावा, त्याचबरोबर ओबीसीचा आरक्षण वाढवून द्यावे, आंदोलनस्थळी जाऊन मी हेच बोललो, ओबीसी समाजाची जी भूमिका आहे, तीच माझी देखील आहे, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
५ वाजेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेट अन्यथा मनोज जरांगे-पाटील घेणार मोठा निर्णय
दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाटला; ठाकरे गटाने साधला जोरदार निशाणा