२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना मोदी सरकार विरोधात विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली असून दुसरीकडे याला तोडीस तोड देण्यासाठी भाजपने सुद्धा विविध बैठक आयोजित करून निवडिकीची आखणी करण्यास सुरवात केली आहे अशातच आता मोदी यांच्या ९ वर्षाच्या कालखन्डावर पुन्हा एकदा काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारने देशात सुईपासून रॉकेट पर्यंतचा विकास केला. चंद्रावर चांद्रयान-३ सोडले त्या इस्रोची स्थापनासुद्धा काँग्रेस सरकारच्या काळातच झाली.
२०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेवर आले पण या सरकारने मागील ९ वर्षात नवीन काहीच उभे केले नाही. उलट काँग्रेस सरकारने उभे केलेल्या सर्व बँका, रेल्वे, विमानतळे, विमा कंपन्या विकून टाकल्या. देश स्वतंत्र झाल्यापासून ६७ वर्षांत सर्व सरकारांनी मिळून ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले पण मोदी सरकारने मागील ९ वर्षात तब्बल १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे पटोले यांची जाहीर सभा झाली. या सभेत ते म्हणाले, केंद्रातील तानाशाही सरकारच्या विरोधात ही लढाई सुरु आहे. मोदी सरकारने महागाई प्रचंड वाढवली, औषधे महाग केली, शेतीला लागणाऱ्या साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटले. शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसांकडून जीएसटीच्या माध्यमातून पैसे काढून मोदी त्यांच्या मित्रोंचे खिसे भरत आहेत.
उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि सत्तेत येताच मोदी सरकार संविधानच संपवायला निघाले. जनसंवाद यात्रेत लोकांशी संवाद साधताना केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकारबद्दल तीव्र नाराजी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जनतेशी सुरु झालेला हा संवाद थांबणार नाही, १२ तारखेपर्यंत जनसंवाद यात्रा सुरु राहणार आहे, त्यानंतर पुन्हा एक यात्रा घेऊन आम्ही तुमच्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साधला चाणक्य मंडळच्या विद्यार्थ्यांशी संवाद
भाजपच्या निष्ठावंतांना डावलून नव्याने आलेल्यांना संधी दिल्यामुळे या जिल्ह्यात संताप ?