पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची पुर्वतयारी करून घेणाऱ्या माजी निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी संचलित चाणक्य मंडळ परिवाराच्या विद्यार्थ्यांशी काल संवाद साधला.

चाणक्य मंडळ परिवाराचे हजारो विद्यार्थी अधिकारी होऊन महाराष्ट्रासह देशात आणि देशाबाहेर कार्यक्षम अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख पटवून देत आहेत. हेच चाणक्य मंडळ परिवाराच्या आत्तापर्यंतच्या कार्याचे यश असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले. संस्थेचे हे कार्य वृद्धिंगत होत राहो, यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी चाणक्य मंडळपरिवारचे सर्वेसर्वा अविनाश धर्माधिकारी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला.