कोल्हापुरातुन एक मोठी बातमी समोर येत असून भाजपच्या नूतन पदाधिकारी निवडीनंतर कोल्हापुरच्या आजऱ्या या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर आजऱ्यामध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोपही वरिष्ठ नेत्यावर करण्यात आला आहे. या प्रकारानंतर भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आजऱ्यात असणाऱ्या कार्यालयातील फलक उतरवला असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच कार्यकर्त्यांनी कार्यालयावरील झेंडा उतरवून दरवाजावरील कमळ चिन्हही पुसून टाकले आहे. भाजपच्या अनिरुद्ध केसरकर यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर भाजपमधील हा अंतर्गत वाद चांगलाच उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घडलेल्या प्रकारानंतर कोल्हापूर तालुक्यातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आज बैठक घेऊन पुढची रणनीती जाहीर करणार आहेत. तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आता चिंतन करावे लागणार आहे.
अशातच काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिलाध्यक्ष समरजित घाडगे हे सुद्धा नाराज असल्याचे समोर आले होते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर समरजित घाडगे यांचे कट्टर विरोधक आमदार हसन मुश्रीफ यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदाची शपत घेतली होती त्यामुळे नाराज झालेले समरजित घाडगे दोन दिवस नॉट रिचेबल होते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी भाजपा न सोडण्याचा निश्चय केला होता.
तरुणांना दिशा देण्यासाठी महाविद्यालयांनी नावीन्यपूर्ण उपक्रमात वाढ करावी; चंद्रकांत पाटलांचे आवाहन