Latest Marathi News

BREAKING NEWS

माजी महापौर किशोरी पेडणेकर विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

0

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी अधिक वादात असल्याचे चित्र आता दिसून येत आहे. किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. महपालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषेद घेऊन पेडणेकर यांच्यावर अनेक आरोप लगावले होते अशातच महिन्याभरापूर्वी ईडीनं पेडणेकरांविरोधातील आरोपांप्रकरणाची कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून मागवली होती. या विभागाकडून पेडणेकरांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या आधारे कागदपत्रे तपासल्यानंतर ईडीनं किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं जात आहे. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सुचनेनुसार हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.असा आरोपच किरीट सोमय्या यांनी पेडणेकर यांच्यावर लावला होता. यावर अद्याप उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

‘डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मोदी पंतप्रधान झाले; आता सत्तेत येताच तेच संपवायला निघाले’

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साधला चाणक्य मंडळच्या विद्यार्थ्यांशी संवाद

Leave A Reply

Your email address will not be published.