गतवर्षी एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेत बंड केलं होतं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली होती. अशातच २ जुलैला अजित पवारांसह ९ आमदारांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावेत अशी चर्चा सुरु आहे. यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
हे ही वाचा >>“माझं देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे सांगणं आहे की…”,शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना जाहीर आव्हान
हे ही वाचा >>भुजबळांच्या विरोधात शरद पवार यांनी नाशिकमध्ये फुंकले रणशिंग !
अमित ठाकरे म्हणाले, “मला वाटतं, दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणं गरजेचं आहे. ते म्हणजे राज ठाकरे… आम्ही या राजकीय चिखलात नाही. त्यामुळे मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. राज ठाकरेंनी आम्हाला येथेपर्यंत पोहचवलं आहे. यापुढील निर्णयही राज ठाकरेच घेतील.”