Latest Marathi News

BREAKING NEWS

आपल्या क्षेत्रातील मूलभूत माहिती व्यवसायिकांनी ठेवावी – खासदार निंबाळकर

0

बार्शी |

कोणत्याही क्षेत्रात आणि व्यवसायात आणि राजकारणा सारख्या सेवा क्षेत्रातही कार्यरत असताना मूलभूत माहिती व ज्ञान आत्मसात करून घेण्याची गरज आहे. अन्यथा प्रशासनाच्या अडेलतट्टूपणाला सामोरे जावे लागते. असे मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले. रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभात ते बोलत होते.

यावेळी आमदार राजेंद्र राऊत, नूतन अध्यक्ष सतीश अंधारे, मावळते अध्यक्ष चेतन जैन, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरणार-पाटील, राष्ट्रीय उपाअध्यक्ष सुनील फुरडे, माजी अध्यक्ष शांतिलाल काटारिया, सहसचिव डॉ.धर्मवीर भारती, विस्तार समितीचे अध्यक्ष शशिकांत जिद्दीमणी, विशेष विभागीय समन्वयक आशीष पवार, बार्शी शाखेचे सचिव समाधान पाटील, कोषाध्यक्ष भरत परमार, यूथ विंग समन्वयक अमित इंगोले, अध्यक्ष चेतन जैन, सचिव नीलेश जैन, उपाध्यक्ष नितिन देशमुख, अभिजीत सोनिग्रा, यूथ विंग सचिव प्रतीक रुद्रवार, महिला यूथ विंग समन्वयक गुंजन जैन, महिला यूथ विंग सहसमन्वयक पल्लवी सोनिग्रा, मॅनेजींग कमिटी मेंबर डॉ.भरत गायकवाड, अमर काळे, भूषण कदम, भूषण कटारिया, अतुल माढेकर, आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


यावेळी बोलताना खासदार निंबाळकर यांनी आपण राजकारणाकडे सेवाक्षेत्र म्हणून पाहतो, अपरीहार्य परिस्थिति निर्माण झाल्यामुळे राजकारणाकडे वळलो, पूर्वी व्यवसायात काम केले. आजपर्यंत आलेल्या अनुभवा अंती सर्व क्षेत्राची चौफेर माहिती असणे गरजेचे वाटते. प्रशासनामध्ये ग्रामसेवकांपासून राज्याच्या सचिवपदापर्यंत सर्वांना तोंड देण्याची वेळ येते तेंव्हा ज्ञानचं उपयोगी पडते. बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांनी नवे शासन निर्णय व कायदे यांची माहीत करून घ्यावी, असे अवाहण त्यांनी केले.

यावेळी बोलताना आमदार राऊत यांनी व्यापार, उद्योग, कारखानदरी करणार्या, सर्वांनाच प्रोत्साहनाचे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचे कर्तव्य लोकप्रतिनिधी या नात्याने वेळोवेळी केले आहे. बांधकाम क्षेत्रातील सर्वांना कायम सहकार्याची भूमिका राहील, असे अभिवचन त्यांनी दिले. यावेळी नूतन अध्यक्ष अंधारे यांनी आपल्या मनोगतामध्ये बार्शीचा गृहनिर्माण क्षेत्राचा विस्तार वाढला आहे. शहरामध्ये मोठे गृहप्रकल्प आकारास येत आहेत. बांधकाम क्षेत्रातील सर्वांच्या अडचणी दूर करण्यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना कटारिया यांनी बांधकाम व्यवसायिकांनी सामाजिक संबंध वाढविले पाहिजेत, गुणवत्ताधारित कामे करून आपली विश्वासार्हता व प्रतिमा जपली पाहिजे. नवतंत्रज्ञांना अवगत करून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी फुरडे, जिद्दीमणी, यांनीही मनोगते व्यक्त केली. अभिजीत सोनिग्रा यांनी सूत्रसंचालन केले. चेतन जैन यांनी आभार मानले. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.