Latest Marathi News

BREAKING NEWS

“माझं देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे सांगणं आहे की…”,शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना जाहीर आव्हान

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जून रोजी भोपाळ येथे भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती.पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.पंतप्रधानांच्या या टीकेला शरद पवार यांनी आज (८ जुलै) येवल्यातून (नाशिक) उत्तर दिलं.

हे ही वाचा >>भुजबळांच्या विरोधात शरद पवार यांनी नाशिकमध्ये फुंकले रणशिंग !

हे ही वाचा >>“आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे त्वरित मागे घ्या…!”

शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा पार पडली. यावेळी शरद पवार म्हणाले, १०-१२ दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं. वेगवेगळे आरोप केले. हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केले.शरद पवार म्हणाले, माझं देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे सांगणं आहे की, संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे. ती त्यांनी लावावी आणि आमच्यापैकी कोणी जर भ्रष्टाचारात सहभागी आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची असेल नसेल ती सगळी सत्ता वापरा, चौकशी करा, तपास करा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेलाय असं तुम्हाला वाटेल किंवा तुमचा तसा निष्कर्ष निघेल त्याला हवी ती शिक्षा द्या. त्यासाठी तुम्हाला आमचा पाठिंबा असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.