Latest Marathi News

BREAKING NEWS

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण..!!

0

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर मी चाचणी केली. त्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. शहा यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एक दिवसापूर्वीच अमित शहा लोकमान्य टिळक यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाला मंचावर व समोर अनेक लोक उपस्थित होते.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला आयसोलेट करून स्वत:ची करोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही शहा यांनी केले. प्राथमिक प्राथमिक लक्षणे असल्याने त्यांना होम क्वारंटीन का केले नाही, या बाबत डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना होम क्वारंटीन न करता थेट रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आपली तब्येत ठीक असल्याचे शहा यांनी आवर्जून सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.