Latest Marathi News

BREAKING NEWS

महानायकाची कोरोनावर मात..!! रुग्णालयातून डिस्चार्ज

0

मुंबई : कोरोनाच्या महामारीच्या विळख्यात सामान्य माणसासोबत अनेक नेते मंडळी, अभिनेते देखील आले आहेत. कित्येक लोकांनी कोरोनावर मात देखील केली आहे. अशातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

स्वतः ट्विट करत त्यांनी आपल्याला कोरोना असल्याची माहिती दिली होती, मात्र आज अमिताभ यांनी देखील कोरोनावर मात केली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी बरे झाल्याचे वडिलांचे आशिर्वाद, सर्वांच्या प्रार्थना, आणि डॉक्टरांचे प्रयत्न यांना दिले आहे.

अमिताभ यांना कोरोना झाल्याचे समजताच त्यांच्या कित्येक चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली होती. कित्येकांनी देवाला साकडे घातले होम हवन केले.आज अमिताभ यांना डिस्चार्ज मिळाल्याने या सर्वांनाच आनंद झाला असेल हे मात्र नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.