मोहोळ – सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर
इंचगावजवळ हरणाचे एक पाडस हायवे वर आले, मग कांही वाहन चालकांनी कुतूहलाने व्हिडीओ काढायला सुरुवात केली. ते पुढं धावत होतं. अन कार मागे कांही अंतरावर गेल्यावर पाडसानं विरुद्ध लेनमध्ये उडी घेतली. तेंव्हा सुसाट येणाऱ्या फॉर्चूनरने त्याला उडवले. अन ते पाडस जागेवरच गतप्राण झाले. अशा रीतीने एका पाडसाची धाव अपयशी ठरलीय.
जेंव्हा अनपेक्षित धडक झाली तेंव्हा धाडकन आवाज झाल्यावर लोक जमा झाले मात्र तोपर्यंत फॉर्च्युनर निघून गेली होती.
त्यामुळं नागपूर रत्नागिरी मार्गालगत प्राण्यांच्या वावरानुसार फलक लावण्याची मागणी स्थानिकांनी केलीय.