Latest Marathi News

BREAKING NEWS

श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांची पर्स चोरणारी महिला गजाआड

0

धाराशिव |

उदगीर, जि. लातूर येथील- सोनी माधव केंद्रे, वय 35 वर्षे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीरात दर्शन करुन महाद्वारातून बाहेर येत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेउन एका अनोळखी महिलेने सोनी केंद्रे यांच्या जवळील 1,200 ₹ रक्कम असलेली पर्स हिसकावून चोरुन नेली होती. यावरुन सोनी केंद्रे यांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून हा गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान नवरात्र उत्सवा निमीत्त स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंदीर आवार- परिसरात गस्तीस असताना पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करुन बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथील- प्रियंका युवराज उर्फ धोंड्या भोसले, वय 37 वर्षे हिस श्री. तुळजाभवानी मंदीर महाद्वार समोरुन ताब्यात घेउन पथकातील महिला पोलीस अंमलदारामार्फत तीची अंगझडती घेउन तीच्या जवळील नमूद चोरीतील रोख रक्कम हस्तगत केली. तसेच पुढील कारवाईस्तव नमूद महिलेस चोरीच्या रकमेसह तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, जावेद काझी, नितीन जाधवर, अजित कवडे, भालचंद्र काकडे, शैला टेळे, अशोक ढगारे यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.