महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते.. फडणवीस यांच्या ‘त्या’ पत्रावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
मुंबई : नवाब मलिक यांच्या युती सरकारमध्ये समावेशावरुन विरोधकांनी भाजपवर हल्ला चढवला होता. या विरोधाला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले एक पत्र पोस्ट केले होते. या पत्रात नवाब मलिक यांना युतीसोबत न घेण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुले पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्रावरुन आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले “हल्ला फक्त फडणवीसांवर निशाणा साधला आहे. हल्ला फक्त मलिक यांच्यावरच का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. इतरांना मांडीवर बसवले असल्याचा आरोपही त्यांनी आहे.
नेमके काय म्हणाले खासदार संजय राऊत..
अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते.. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ED फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंड चे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे.. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर. बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी.. जात मांजराची..
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नेमके काय म्हटले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणाले की, सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर येऊ लागल्याची चर्चा होऊ लागली आहे.