Latest Marathi News

BREAKING NEWS

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे अडचणीत; एसआयटी करणार चौकशी

0

मुंबई,७ डिसेंबर / प्रतिनिधी :-भाजप आमदार नितेश राणे वारंवार ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत असलेल्या दिशा सालियनच्या हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे आता चांगलेच अडचणीत सापडणार आहेत. राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी करणार आहे. सुजाता सौनिक एसआयटीसंदर्भात आजच चौकशीची ऑर्डर काढणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना आता चौकशीला सामोरं जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.

मागील काही दिवसांत दिशा सालियन हत्या प्रकरण फारच ढवळून निघालं आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्याने उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.