Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापूरच्या लेकीनं तब्बल 38 कि.मी. समुद्रात स्विमिंग करत केला वर्ल्ड रेकॉर्ड …!

0

सोलापूर |

सोलापूरच्या कीर्ती भराडिया या मुलीने सलग सात तास 21 मिनिटं मुंबईतील समुद्रात स्विमिंग करून तब्बल 38 किलोमीटरचे अंतर पार केले. गुरुवारी वरळी सी लिंक येथून सकाळी 11 वाजता पोहण्यास सुरुवात केली होती. याचे वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहे. अशी माहिती श्याम भराडीया यांनी दिली. सदर विक्रमाचे परीक्षण करण्याकरिता वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी पूर्ण वेळ उपस्थित होते.

सोलापूरच्या किर्ती भराडिया या स्विमरची अखेर विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्यामुळे तिच्यावर सोलापूर जिल्ह्यातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबई समुद्रात वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया ३८ किलोमीटर अंतर साडेसात तासात पोहून केले रेकॉर्ड केला आहे. सोलापूरच्या शिरपेचात मानाचा रोवला तुरा रोवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.