Latest Marathi News

BREAKING NEWS

“सराफ व्यावसायिक सागर लोळगे दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!”

0

बार्शी |

बार्शी शहरातील नामांकित सराफ व्यावसायिक सागर लोळगे व सौ. सरिता लोडगे यांच्या हस्ते अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन 5 डिसेंबर रोजी करण्यात आले. ‘सिद्धी ज्वेलर्स'( रघुनाथ रामचंद्र लोळगे) सोन्या व चांदीचे सुप्रसिद्ध दुकान आहे, सागर लोळगे हे गेल्या 22 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहेत. लोळगे यांची तिसरी पिढी या व्यवसायामध्ये कार्यरत आहे त्याचा सामाजिक कामातही सहभागी असतात.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. आज दिनांक 5 डिसेंबर अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण सागर लोळगे व सरिता या दाम्पत्यांने केले.

Leave A Reply

Your email address will not be published.