Latest Marathi News

BREAKING NEWS

कर्नाटकात मराठी शाळा तसंच शहाजी महाराजांच्या समाधी स्मारकासंदर्भात बोलणी करणार – चंद्रकांत पाटील

0


कोल्हापूर |

उच्च व त्यांनतर शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकातील मराठी शाळांची बांधणी, मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती तसंच कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीचं स्मारक बांधण्यासंदर्भातील बोलणी कर्नाटक सरकारसोबत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यातून दोन्ही राज्यांतील कटुता कमी होऊन सहकार्याची भावना वाढीस लागेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले कि, त्या भागातल्या मराठी भाषिक शाळांच्या इमारतींची अतिशय दयनीय अवस्था आहे. शहाजी महाराजांचं स्मारक तिथे व्हावं यासाठी आम्ही कर्नाटक सरकारला सांगणार आहोत कि, स्मारकासाठी लागणारी जी रक्कम आहे ती आम्ही तुमच्याकडे डिपॉझिट करून ठेवतो. कारण एका राज्याच्या सरकारला दुसऱ्या राज्यात जाऊन काम करता येत नाही. त्यामुळे आम्ही त्यासाठी लागणारी रक्कम तुमच्याजवळ डिपॉझिट करू ती रक्कम वापरून दोन्ही सरकारने मिळून शहाजी राजांच एक चांगलं स्मारक तयार करूया जे पाहायला सर्व जगातून लोकं आली पाहिजेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणले, त्या भागातील बऱ्याच लोकांना मराठी नीट बोलता येत नाही. त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक अपॉईन्ट करता येतील का? याबाबत विचार केला पाहिजे. ते शिक्षक लोकांची मातृभाषा सुधारतीलआणि यामध्ये कर्नाटक सरकारच म्हणणं असण्याचं काही कारण नाही. मराठी भाषिक शाळांची बांधणी नीट झाली, मराठी चांगलं शिकवता यावं यासाठी चांगले शिक्षक मिळाले, शहाजी महाराजांच्या स्मारकासाठी काही मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या, तर आपोआपच तिथलं ऍग्रेशन कमी होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई हे ६ डिसेंबर रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  महापरिनिर्वाणदिनानिमित्त बेळगाव दौऱ्यावर असणार आहेत. ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही कार्यक्रमांना येण्याचा बेळगाव येथील आंबेडकरवादी संघटनांचा आग्रह असल्यामुळे हा दौरा ६ डिसेंबर रोजी करण्यात आला आहे. या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सीमावासीयांना भेटण्याचे, हुतात्म्यांच्या घरी जाण्याचे असे अनेक कार्यक्रम आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.