Latest Marathi News

BREAKING NEWS

वॉशिंग्टन येथे फुलब्राईट प्रोग्रॅम सांगता ; डिसले गुरुजीच्या रूपाने महाराष्ट्राचा अनोखा सन्मान

0

बार्शी |

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांना अमेरिकन सरकारकडून प्रतिष्ठित फुल ब्राईट स्कॉलरशिप जाहिर झाली होती त्या कार्यक्रमाची सांगता वॉशिंग्टन मध्ये झाली. यावर्षी जगभरातील ४० शिक्षकाला ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी केले. आता भविष्यात नवी आव्हाने, नवे ध्येय गाठण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असेही दिसले गुरुजींनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

या शिष्यवृत्तीमुळे जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शैक्षणिक संशोधन करण्याची संधी मिळाली असून यामुळे अमेरिकेतील शिक्षण पद्धती जवळून अभ्यास करता आला. या शिष्यवृत्तीमुळे जगभरातील प्रतिभावान शिक्षकांना एकत्र आणून जगभरातील शिक्षण पद्धती साठी योगदान देण्यासाठी नवी आव्हाने नवे देखील वाटण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत अशी प्रतिक्रिया रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी दिली.

या फुलब्राईट कार्यक्रमाची सांगता वॉशिंग्टन मध्ये झाली. या तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमांमध्ये अमेरिकन सरकारच्या शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, शिष्यवृत्तीतुन संशोधन पूर्ण केलेले शिक्षक सहभागी झाले होते या कार्यक्रमात अनेकांच्या रिसर्च प्रोग्राम ची माहिती घेण्यात आली वेगवेगळ्या देशातील प्रतिभावान शिक्षकांना यानिमित्त भेटता आले व त्यांचे काम जाणून घेता आले अमेरिकन शिक्षण पद्धती ही बारकाईने घेता अशी रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी ट्विटर संदेशात सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.