Latest Marathi News

BREAKING NEWS

“महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही!”, जितेद्र आव्हाड यांचा संताप

0

मुंबई : महाविकास आघाडीने ‘महामोर्चा’चं आयोजन केलं आहे. या मोकळा आता मोठ्या सांख्याने तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमायला सुरवात झाले आहेत, तसेच महापुरूषांच्या अवमानाविरोधात मविआने हे आंदोलन पुकारलं आहे. या ‘महामोर्चा’आधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. “महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही!”, असं ते म्हणालेत.

महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही! त्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो आहोत. ठाण्याहून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला निघाले आहेत. या लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे. अनेक दिवस या सरकारमधील नेतेमंडळी महापुरुषांबद्दल करत असलेला अपमान याच्या विरोधात हा आक्रोश आहे, असं आव्हाड म्हणालेत.

मुंबईतील हा महामोर्चा दडपण्यासाठी अशा प्रकारचा राजकारण करून ठाण्यामध्ये आंदोलन केली जात आहेत. यात नागरिकांना वेठीस धरलं जातं यात रिक्षा चालकांना मारण केलेली आहे परिवहन सेवा बंद केलेली आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला आहे. हे सर्व करून या लोकांना काहीही मिळणार नाही, असंही आव्हाड म्हणालेत.ठाण्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला चाललेत जवळपास 5000 हून जास्त नागरिक ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. शरद पवार यांच्या समवेत मी मोर्चामध्ये सामील होत आहे, असं आव्हाडांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.