Latest Marathi News

BREAKING NEWS

“वीरशैव गवळी ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत शाहीर दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!”

0

बार्शी |

बार्शी शहरातील वीरशैव नगरकर गवळी ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत शाहीर व त्यांच्या पत्नी वैशाली शाहीर या दाम्पत्याच्या हस्ते १८ मार्च रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. हेमंत शाहीर यांचा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वर जयंती निमित्त बार्शी शहरांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात येते. हेमंत शाहीर यांचे बार्शी शहरातील गवळी गल्ली येते ‘शाहीर टी हाऊस’ व ‘शाहीर किचन मार्ट’ आहे. त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून शहरांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय आहे. मातृभूमी प्रतिष्ठानच्यामार्फत बार्शी शहरांमध्ये विविध उपक्रमही राबवली जातात. अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण हेमंत शाहीर व वैशाली या दाम्पत्यांने केले.

Leave A Reply

Your email address will not be published.